जळगाव, दि. 7 - महिला व बाल विकास विभाग
महाराष्ट्र राज्यतंर्गत एकत्मिक बाल विकास प्रकल्प, जळगाव नागरी
कार्यालयाच्यावतीने शिवाजी नगर, गेंदालाल मिल विभागात पोषण अभियाना निमित्त विविध
कार्यक्रम घेण्यात आले. विभागातील गरोदर माता यांचे ओटी भरण कार्यक्रम, किशोरी
मुलींना आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता मार्गदर्शन, स्वच्छता याबाबत जनजागृती व
मार्गदर्शन करण्यात आले.
या
कार्यक्रमात बेटी बचाव, बेटी पढाव जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित किशोरी
मुलींना शिक्षणाचे महत्व तसेच स्वावलंबी होणेबाबत प्रोत्साहित करण्यात आले. या
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्रीमती. बागुल यांनी पोषण अभियान लोकचळवळ होणे
आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी पोषण अभियान उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच
माहे सप्टेंबर 2018 हा संपूर्ण महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्याबाबत
मार्गदर्शन केले. या अभियान कार्यक्रमात माझी कन्या भाग्यश्री या योजनेची माहितीहि
बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती बागूल यांनी दिली.
कार्यक्रमास नगरसेविका जोहरी तसेच
वैद्यकीय अधिकारी श्रीमती मालीनी पवार उपस्थित होते. मुख्यसेविका श्रीमती
दुबळगुंडे, श्रीमती पाटील, श्रीमती सोनवणे, श्रीमती रत्ना चौधरी, श्रीमती जिजा
चौधरी, श्रीमती तडवी आदि मुख्यसेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमास विभागातील गरोदर स्तनदा माता, किशोरी
मुली, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्ताविका श्रीमती नर्गिस
तडवी यांनी केले. श्रीमती जोहरी यांनी मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी यांनी
उपस्थित महिलांना, किशोरींना पोषणआहार, स्वच्छता तसेच गरोदरपनातील घ्यावयाची काळजी,
बालकांचे आरोग्य त्याचबरोबर गोवर व रुबेला लसीकरण अभियान नोव्हेंबर 2018 पासून
राबविण्यात येत आहे. त्याबाबत माहिती व मार्गदर्शन केले. सेविका श्रीमती कविता
ठाकरे व श्रीमती रंजना पवार यांनी बेटी बचाव, बेटी पढाओ यावर गीत गाईले.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेल्या
सेविका श्रीमती मिनाक्षी सुरवाडे व मदतनीस श्रीमती शोभा जोशी यांना निरोप देण्यात
आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन श्रीमती करुणा तायडे, सेविका
यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास मुख्यसेविका, सेविका-मदतनीस यांनी मेहनत
घेऊन उत्साहाने पार पडला.
०००
No comments:
Post a Comment