जळगाव, दिनांक 2 (जिमाका) : पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी. पी. ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 येथे दि. 17 मार्च, 2022 रोजी सकाळी अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
या
अदालतीत टपाल वस्तु, मनी ऑर्डर,
बचत बॅंक, प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी विचारात
घेतल्या जातील. तक्रारींचा
उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबची तक्रार दोन प्रतीत सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज. शि.) आणि सचिव डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे
कार्यालय, जी. पी. ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे दि.1 मार्च पर्यंत
पाठवावी, असे
आवाहन करण्यात आले आहे.
००००
No comments:
Post a Comment