जळगाव, दिनांक 4 (जिमाका) : हळद लागवडीपासून प्रक्रिया व विक्री पर्यंत शेतकरी, प्रक्रीयाकार तसेच निर्यातदारांना येणाऱ्या अडचणी विचारात घेता महाराष्ट्र राज्याचे हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चितीकरीता शासनाला सल्ला देण्यासाठी कृषि व पदुम विभाग शासन निर्णय क्र.हसंप्र-2020/प्र.क्र.165/9अे, दि.07/09/2020 अन्वये श्री.हेमंत पाटील, लोकसभा सदस्य, हिंगोली लोकसभा मतदार संघ, यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीद्वारे महाराष्ट्रातील हळद पिकाच्या लागवड, प्रक्रीया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाय योजनांच्या अनुषंगाने राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा तयार करण्यात आला आहे.
हळद
संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा सर्वसामान्यांच्या सुचनांकरीता कृषि विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असून यासंबंधीत
शेतकरी,
संशोधक, उद्योजक, निर्यातदार, ग्राहक यांनी आपल्या सुचना phytocell@gmail.com या ईमेलवर अथवा कृषि उपसंचालक, फलोत्पादन-3, कृषि
आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, कृषिभवन जवळ, शिवाजीनगर, पुणे-411 005 या पत्त्यावर दि.07 मार्च, 2022 अखेर पर्यंत पोहोचतील या बेताने पाठविण्यात याव्यात.असे
सहसंचालक फलोत्पादन कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य अशोक किरनळळी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment