Wednesday, 2 March 2022

भुसावळ येथे 4 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

 

            जळगाव, दिनांक 2 (जिमाका) :  पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर भुसावळ विभाग, भुसावळ येथे दि. 4 मार्च, 2022 रोजी सकाळी अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

            या अदालतीत  टपाल, मनी ऑर्डर, बचत बॅंक, स्पीड पोस्ट,कांऊटर सेवा, डाक वस्तु, पार्सल  या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. उदा. दिनांक व ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी संबंधितांन डाक सेवे बाबतची आपली तक्रार अधिक्षक डाकघर, भुसावळ विभाग, भुसावळ – 425 201 यांच्या नावे दि.2 मार्च पर्यंत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००


No comments:

Post a Comment