जळगाव, दिनांक 3 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट् राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांचे मार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिलांना स्वरक्षण , त्याचे हक्क, कर्तव्य, कायदेविषयक जाणिव, शारिरीक सुद्ढता इ. विषयक जाणिव निर्माण करणे महिलांमधील विविध कला गुणांना वाव देवून त्यांच्यातील सुप्त गुणांना जागतिक महिलाच्य माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व्दारा प्रतिवर्षी उपलब्ध करुन दिली जात आहे.
या
वर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय जळगाव तथा जळगाव जिल्हा विविध खेळाच्या
संघटना यांचे संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिवस सप्ताह निमित्त दिनांक 5 ते 8
मार्च, 2022 या कालावधीत जळगाव जिल्हयातील महिलांकरीता विविध र्स्पर्धाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे करण्यात आलेले आहे. तसेच
सदर स्पर्धेत विजयी झालेल्या संघाचा सन्मान करण्याकरीता बक्षिस वितरण कार्यक्रमाचे
आयोजन दि. 8 मार्च, 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता कांताई हॉल , जळगाव येथे करण्यात येणार
आहे. सदर स्पर्धेत खुल्या वयोगटातील महिला / शाळा महाविदयालयातील विदयार्थीनी
सहभाग घेवु शकतील, ईच्छुक महिलांनी आपली प्रवेशिका दिनांक 4 मार्च, 2022 पर्यन्त
कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे जमा करुन आपली
प्रवेश निश्चित करावयाचा आहे.
या
कार्यालयामार्फत जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त सोबत जोडलेल्या कार्यक्रम
पत्रिकेनुसार कार्यक्रम करण्याचे निश्चित झालेले असुन त्यात आपल्या शाळेने /
महाविदयालयाने / संस्थेने / मंडळाने/ संघटनेने / बचत गटाने मोठया संख्येने सहभागी
होवून सदर शासनाचा हा उपक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. सदर कार्यक्रमाचे
आयोजन करतांना देशात उदभवलेल्या कोविड -19 व ओमायक्रॉन महामारीच्या प्रादुर्भावाचा
विचार होवून कोणत्याही प्रकारचे एकत्रिकरण होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे.
जळगाव
जिल्हयातील सर्व शाळा / महाविदयालय/ क्रीडा मंडळे/ युवक मंडळे/ यांनी देखील खाली
दिलेल्या परिपत्रकात नमुत केल्या प्रमाणे शालेय / महाविदयालय स्तरावर दि. 8 मार्च, 2022 कालावधीत जागतिक महिला
दिनामिनित्त सप्ताह मोठया प्रमाणात साजरा
करावा,
1)
सॉफटबॉल दि. 5 मार्च, 2022 रोजी सकाळी 8 वाजता ,श्री. शिवछत्रपती जिल्हा क्रीडा
संकुल जळगाव, डॉ. प्रदिप तळवेलकर जळगाव जिल्हा सॉफटबॉल असो.
2)
मैदानी – 50 मी. धावणे, 2)4x100 मी. रीले, 3) थाळी फेक, 4)
गोळा फेक, दिनांक 5 मार्च, 2022 रोजी
सकाळी 8 वाजता श्री. शिवछत्रपती जिल्हा
क्रीडा संकुल, जळगाव श्री. राजेश जाधव, श्रीमती कांचन विसपूते जळगाव जिल्हा
ॲथलेटीक्स असो.
3) खो-खो दिनांक 5 मार्च, 2022
रोजी सकाळी 8 वाजता, श्री. शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव श्री. सुदांशु
पोळ जळगाव जिल्हा खो- खो असो. 4)हॉकी-
दिनांक 5 मार्च, 2022 रोजी दुपारी 3
वाजता श्री शिवछत्रपती जिल्हा क्रीडा
संकुल, जळगाव श्री. फारुख शेख जळगाव
जिल्हा हॉकी असो, 5)सेवन साईड फुटबॉल – दि. 7 मार्च, 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता
श्री शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव श्री. मोहसीन जळगाव जिल्हा फुटबॉल असो. – 8390200143,
6) बुध्दिबळ – 7 मार्च, 2022 रोजी
सकाळी 8.30 वाजता श्री शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव श्री. प्रविण ठाकरे
जळगाव जिल्हा बुध्दिबळ असो. 7)बॅडमीटन –
दि. 7 मार्च, 2022 रोजी सकाळी 8 वाजता
श्री शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव श्री. किशोर सिंग -9421121106
श्री. अभय मेनपुरी जळगाव जिल्हा बॅडमीटन
असो.
8) लॉनटेनिस – दि. 7 मार्च, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता श्री शिवछत्रपती
जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव श्री.
कृपालसिंग ठाकुर जिल्हा लॉनटेनिस असो. 9) बॉस्केटबॉल
दि. 7 मार्च, 2022 रोजी सकाळी 8 वाजता श्री शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव
श्री. वाल्मीक पाटील, श्री. जितेंद्र शिंदे जळगाव जिल्हा बास्केटबॉल असो. 11) देशभक्तीपर गीत गायक स्पर्धा दि.
8 मार्च, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता
कांताई हॉल जळगाव श्री. दिपक चांदुरकर चांदुरकर प्रतिष्ठाण जळगाव – 9422774911,
महिला दिवस व बक्षिस वितरण समारंभ 8 मार्च, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता कांताई हॉल
जळगाव श्रीमती अनिता कोल्हे, श्रीमती कांचन विसपूते.
महत्वाच्या सूचना नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.
सर्व स्पर्धेमध्ये कोणत्याही
वयोगटातील महिला / मुली सहभागी होवू शकतील, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत कमीत कमी 6 व जास्त 12 महिला
स्पर्धक साथसंगत देणाऱ्या सह सहभागी घेवू शकतील, साथसंगत पुरुष / महिला कोणतीही
घेता येईल परंतु साथसंगत देणारे पुरुष असतील तर त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार
नाही, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे.
००००
No comments:
Post a Comment