जळगाव, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा) :- ८ मार्च हा जागतिक महिला दिन असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे सकाळी ११.०० वाजता महिलांसाठी असलेले सामाजिक कायदे, विविध योजना व मतदार यादीत महिलांची नोंदणी वाढावी यासाठी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,
सदर जनजागृती कार्यक्रमासाठी मा. श्री. तुकाराम
हुलवळे, उपजिल्हाधिकारी ( निवडणुक), जळगाव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित
होते. तसेच श्रीमती वैजयंती तळेले, अध्यक्ष बाल कल्याण समिती जळगाव डॉ. शैलजा
चव्हाण, ॲङ प्रदिप आत्माराम पाटील, श्री. नितीन विसपुते, सदस्य- बाल कल्याण समिती
जळगाव, ॲङ आशिष पाटील, सदस्य- स्थानिक तक्रार समिती, जळगाव हे उपस्थित होते.
या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या
निमित्ताने महिलांसाठी कुटुंबात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी
असलेला सामाजिक कायदा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा -२००५ बाबत
मनियार विधी महाविद्यालयाचे मा. ॲङ
प्रा. विजेता सिंग यांनी कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदी व महिलांचे अधिकार याबाबत
सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा, २०१२
बाबत डॉ. प्रदिप जोशी, मानसोपचार तज्ञ जळगाव यांनी बालकांवर होणाऱ्या लैगिंक अत्याचाराबाबत वस्तुनिष्ठ आकडेवारीसह माहिती
सादर करुन बाल लैगिंक अत्याचाराच्या प्रकरणात बालकांच्या जवळच्या नातेवाईकांकडून
अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक अल्याचे सांगितले, तसेच कायद्यांतर्गत असलेल्या
तरतुदी व बालकांचे अधिकार याबाबत विस्तुत माहिती दिली.
सदर कार्यक्रमात
दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशिय संस्था, जळगावचे विनोंद ढगे व सहकारी यांनी
मनोरंजनात्मक पथनाटयपर कार्यक्रम सादर करुन बेटी बचाओ, बेटी पढाओ व व्यसनमुक्ती या
विषयांवर प्रबोधन केले. तसेच भारतीय गणराज्याच्या लोकशाहीचे बळकटीकरण व्हावे व
त्यामध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व व त्यांचा सहभाग वाढावा यासाठी अधिकाधिक महिलांनी
मतदार याद्यांमध्ये आपली नावे नोंदवून मतदानाचा आपला अधिकार प्राप्त करावा यासाठी
श्री तुकाराम हुलवळे उपजिल्हाधिकारी निवडणुक यांनी सादरीकरणाव्दारे उपस्थित
महिलांना मार्गदर्शन केले तसेच उपजिल्हाधिकारी हुलवळे यानी त्यांच्या अध्यक्षीय
भाषणात महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करुन
उपस्थित महिलांचे उदबोधन केले.
सदर महिला दिनाच्या अनुषंगाने महिला
सशक्तीकरणासाठी विशेष योगदान देणाऱ्या महिला, कोविड-१९ च्या कालावधीत विशेष योगदान
देणाऱ्या महिला तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची चोख जबाबदारी सांभाळणाऱ्या
एकल महिलांचा सत्कार सदर कार्यक्रमात करण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हा व बाल विकास अधिकारी
कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले असे जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment