जळगाव, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा) :- 8 मार्च, 2022 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन पत्रकार भवन येथे कोरोना काळात एकल विधवा झालेल्या महिलांचा महिला मेळावा मा. तहसिलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. सदर महिला मेळाव्यात जळगाव शहरी व ग्रामीण भागातील 100 महिला उपस्थित होत्या राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापुजन, दीपप्रज्वलन करुन मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मिशन वात्सल्याची माहिती मा. बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी दिली.
महानगरपालिका
शिक्षण विभाग अधिक्षक श्री. चंद्रकांत वांद्रे यांनी शिक्षण विभागाकडुन देण्यात
येणाऱ्या योजनांची माहिती दिली. कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. आरोग्य
विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय सपकाळे यांनी आरोग्य विभागातील योजना व
कागदपत्रांची माहिती सांगितली. ॲङ भारती कुमावत यांनीविधी सेवा प्राधिकरणाकडुन
देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सांगितले, महिला अशासकीय सदस्य श्रीमती
तेजस्विता यांनी महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवितांना येणाऱ्या अडचणींबाबत
मार्गदर्शन केले. श्री. मुक्कावर बाल संरक्षण कक्ष यांनी बालसंगोपन योजनेबाबत
माहिती दिली.
तहसिलदार
श्री नामदेव पाटील यांनी तहसिल कार्यालयाकडुन देण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार
योजना, इंदिरा गांधी योजना, रोजगार हमी योजना, रेशनकार्ड इ. बाबत माहिती दिली. व
सर्व विभागातील उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या योजनांचा
लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर केलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या निर्देशांकनुसार
त्वरीत देणेविषयी आदेशित केले. महिला मेळाव्यामध्ये संजय गांधी योजनेचा लाभ मंजुर
झालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांच्या अडचणी
समजुन घेतल्या व महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवित असतांना काही अडचणी असल्यास
संपर्क साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी
उपस्थित महिलांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. उपस्थित अधिकाऱ्यांचे
स्वागत बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी विजयसिंग परदेशी व अति. बाल विकास प्रकल्प
अधिकारी ग्रामीण श्रीमती भोईर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. मेळाव्याचे
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती रत्ना चौधरी यांनी केले आभार श्रीमती नर्गिस
तडवी यांनी मानले महिला मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजनासाठी पर्यवेक्षिका श्रीमती
सुनिता नेरकर, श्रीमती नर्गिस तडवी, श्रीमती रत्ना चौधरी व सर्व अंगणवाडी सेविका
शहरी व ग्रामीण यांनी विशेष परिश्रम घेतले असे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी विजयसिंग
परदेशी यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment