Tuesday, 19 June 2018

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन


            जळगाव, दि.19 – जळगाव येथे सैनिकी मुलांचे वसतिगृहात आजी व माजी सैनिकांच्या इयत्ता आठवी पासून पुढील विविध अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत असलेल्या मुलांना माफक शुल्क आकारुन प्रवेश दिला जातो. त्यांची भोजन, निवास, अन्य सेवा या बाबींकडे विशेष लक्ष दिले जाते. वसतिगृहात कार्यरत कर्मचारी मुख्यत्वे सैनिकी सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामुळे  वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिस्तीविषयी मार्गदर्शन केले जाते. जळगाव जिल्ह्यातील माजी सैनिक, दिवंगत सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नीने आठवी वा पुढील शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी या वसतिगृहाचा लाभ घ्यावा.
            तसेच सैनिकी मुलांचे वसतिगृह जळगाव येथे अशासकीय सहाय्यक वसतिगृह अधिक्षक (पुरुष) -01 हे पद रिक्त आहे. तरी जळगाव जिल्हयातील युध्द विधवा, विधवा तसेच आजी/ माजी सैनिक पत्नी व माजी सैनिक यांना कळविण्यात येते की, इच्छुक उमेदवारांनी अशासकीय पदांसाठी अर्ज करावेत. असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 0257-2241414 वर संपर्क साधावा.                        
                                                                 ००००००

No comments:

Post a Comment