जळगाव, दि. 4 - सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग (समाज
कल्याण) विभागातर्फे कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह माजी सैनिक कॉलनी, जामनेररोड, भुसावळ जि. जळगाव
येथे सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात रिक्त झालेल्या जांगावर नव्याने प्रवेश
घेण्यासाठी इच्छुक विदयार्थीनींकडून रिक्त असलेल्या जागेनुसार वसतीगृह प्रवेश अर्ज
मागविण्यात येत आहेत.
वसतीगृह
प्रवेश रिक्त जागांचा तपशिल प्रवर्ग व विभाग निहाय खालील प्रमाणे
अनुसुचित जाती – विदयालय विभाग -09 , कनिष्ठ महाविदयाल विभाग
-02, एकूण रिक्त जागा 11, अनुसुचित जमाती
- कनिष्ठ महाविदयाल विभाग - 01, एकूण 01, विमुक्त जाती भटक्या जमाती – विदयालय
विभाग 01 एकूण 01, आर्थीकदृष्टया मागासवर्ग
01, कनिष्ठ महाविदयाल विभाग 01, एकूण 02, विशेष
मागासप्रवर्ग -कनिष्ठ महाविदयाल विभाग 01 एकूण -01 अपंग - कनिष्ठ महाविदयाल विभाग 01, एकूण -01, एकूण विदयालय विभाग -11
, कनिष्ठ महाविदयालया विभाग -06 एकूण 17
वरील तपशिल प्रमाणे एकूण रिक्त 17
जागांवर वसतीगृह प्रवेश दयावयाचा आहे. वसतीगृह प्रवेश हा त्या-त्या प्रवर्गातील
रिक्त जांगावर गुणवत्तेनुसार दिला जातो. वसतीगृह प्रवेश निवड झालेल्या
प्रवेशिंताना शासनामार्फत निवास, भोजन, शैक्षणिक लेखन स्टेशनरी साहित्य,
अभ्यासक्रमिक पुस्तके, दिले जातात. तसेच पदवी / पदवीका अभ्यासक्रमिक
विदयार्थीनींना शैक्षणिक व वर्षाकरिता रु. 4000/- व रेनकोट बुट / चप्पल करिता रु
500/- विदयार्थीनींच्य्ा बँकखात्यावर जमा केले जातात. प्रतिवर्षा करिता दोन शालेय
गणवेश/ ड्रेसकोड गणवेश खर्च रकमा शासन निर्णया नुसार विदयार्थींनींच्या बँक
खात्यावर जमा केले जातात. तसेच शासन निर्णया नुसार निर्वाहभत्ता दरमहा रु. 500/-
प्रति विदयार्थीनींस दिला जातो. तसेच दरमहा अतिरिक्त भत्ता रु. 100/- स्वच्छता
प्रसाधनासाठी प्रति विदयार्थीनींस दिला जातो. असे एकुण रक्कम रुपये 600/- दरमहा
विदयार्थीनींच्या बँक खात्यावर जमा केले जातात. शासन निर्णय नुसार सर्व सोयी
सुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात.
तरी इच्छुक विदयार्थीनींनी वसतीगृह
प्रवेशासाठी वर नमुद पत्यावर वसतीगृह प्रवेश अर्जासाठी संपर्क साधावा, वसतीगृह
प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत विनामुल्य पुरविण्यात येतात असे गृहपाल मागासवर्गीय
मुलींचे शासकीय वसतीगृह भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment