जळगाव, दि.20 – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात होत असलेल्या
निवडणूक साठी भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे मतदान
कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी काटेकोर पालक करावे. असे आवाहन
जिल्हाधिकारी तथा नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी
श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी आज जिल्हा नियोजन सभागृहात केले. नाशिक विभाग पदवीधर
शिक्षक मतदार संघातील निवडणूकीसाठी नियुक्त मतदान अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी
आयोजित दूस-या प्रशिक्षणात ते मार्गदर्शन करीत होते.
श्री. निंबाळकर
म्हणाले की, नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघातील निवडणूक प्रक्रीया वेगळी असून यात
मतपत्रिकेचा वापर होणार असून पसंती क्रमांक नुसार मतदात्याला मतदान करावयाचे आहे
मत पत्रिकेवर आपले मत इंग्रजी, मराठी अथवा रोमन अंकाव्दारे नोंदवयाचे आहे. यासाठी
आयोगाने सूचित केलेल्या जांभळयारंगाचे स्केच पेन वापरावयाचे आहेत. निवडणूक
कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचा-यांनी शासकीय वाहनाचांच वापर मतदान प्रक्रियेच्या
कामांसाठी करावयाचा आहे. कोणीही खाजगी वाहन वापरु नये. आयोगाने मतदान
प्रक्रियेसाठी राबविण्याच्या पध्दतीने दिले असलेले साहित्यांच्या वारंवार वाचन
करुन पध्दत समजून घ्यावी. आपली तर्कशक्ती वापरुन कोणताही निर्णय घेवू नका मतदानासाठी
नियूक्त केलेल्या संघाने आपआपसात संपर्क ठेवून समन्वय साधून चांगले काम करावे.
मतदानाच्या पूर्वीच्या दिवशी सर्वानी मतदान केंद्रावर मुक्कामी राहावे अशा सूचना
त्यांनी शेवटी दिल्या.
प्रारंभी
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राहुल मुंडके यांनी मतदान प्रक्रयेशी संबधी
मतपत्रिकेची घडी घालणे, मतदाराच्या बोटाला शाही लावणे, मतदारांची स्वाक्षरी घेणे,
मतपेटीला सिल करणे, मत साहित्य तपासून घेणे, मतदान कक्ष तयार करणे, मतपत्रिकेचा
हिशोब ठेवणे, मतदान प्रतिनिधींना बसण्याची व्यवस्था, निवडणूक आयोगाकडून आलेले विविध
पोस्टर लावणे, केंद्राध्यक्षाची जबाबदारी, दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी
कळविणे, मतपत्रिका तपासवून घेणे, मतदानापूर्वी मतपत्रिका तयार ठेवणे आदि बाबीची
माहिती देवून पहिल्या प्रशिक्षणात सांगितलेल्या सर्व बाबींची उजळणी केली.
प्रशिक्षणास उपस्थितांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले. निवडणूक तहसीलदार एस.व्ही
थोरात यांनी मतपेटी सील करण्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविले. या प्रशिक्षणास प्रांतधिकारी,
केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्र. 1,2, 3
व इतर कर्मचारी उपस्थित होते. ०००
No comments:
Post a Comment