Thursday, 13 June 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भुसावळ येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

              जळगाव, दि. १३ (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत जळगाव येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय  मुलांचे शासकीय वसतीगृह, जुने जळगाव सिंधी कॉलनी, जळगाव येथे  वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.  सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षाकरीता  शालेय विदयार्थी इ. ८ वी साठी तसेच कनिष्ठ  महाविदयालय इयत्ता ११ वी साठी तसेच वरिष्ठ महाविदयालय १२ वी नंतरचे पदवीका / आणि पदविनंतरचे पदव्युत्तर सर्व संवंर्गातील विदयार्थांनी (तसेच व्यावसाईक अभ्यासक्रम वगळून ) या वसतिगृहातून  प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह ,जळगाव यांनी केले आहे.

            प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवास, निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्य व संगणक सुविधा व वायफाय सुविधा व इतर सोयी सुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतीगृहातील गृहपाल एस. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000000

No comments:

Post a Comment