जळगाव दि. 20 ( जिमाका ) :- जिल्हयामध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या प्रभावी अंमलबजावणी, नियंत्रण आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१२/प्र.क्र.३५८/औषधे-२, दि. १५डिसेंबर, २०२१ अन्वये जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर जिल्हास्तरीय समितीमधील खालील अशासकीय सदस्य यांची नियुक्ती ही मा. अध्यक्ष महोदय यांनी मा. पालकमंत्री यांच्याशी चर्चा करुण अंतिम करण्याबाबत शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१२/प्र.क्र.३५८/औषधे-२, दि. १५डिसेंबर, २०२१ नुसार करावयाची अशासकीय सदस्यांची पात्रतेचे निकष हे शासन निर्णयाप्रमाणे खालीलप्रमाणे आहेत.
अन्न सुरक्षा व पोषण
विषयातील ०२ तज्ञ - अन्न पदार्थ पॅकेज्ड इंडस्ट्रीतील ०१ प्रतिनिधी हा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेला स्वतंत्र
अन्न् व्यावसायिक किंवा सीआयआय (CII), एफआयसीसीआय ( FICCI), एएसएसओसीएचएएम
(ASSOCHAM), असोसिएशन ऑफ फुड प्रोसेसर्स ऑफ इंडीया ( AFTI), यांचे राज्यस्तरीय/विभागस्तरीय
प्रतिनिधी, इंडीयन चेंबर्स ऑफ कॉमर्स, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स किंवा इतर राष्ट्रीय,
विभागीय औदयोगिक संघटना यांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती असावी.
अन्न व्यावसायीक यांचे
०२ प्रतिनिधी - हॉटेल, रेस्टॉरंट व केंटरींग व्यावसायिकांचा
०१ प्रतिनिधी हा नॅशनल रेस्टॉरंटस असोसिएशन
ऑफ इंडिया (NRAI), फेडरेशन ऑफ हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंटस असोसिएशन ऑफ इंडिया (FHRAI),
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया कॅटरर्स (FAIC), ऑल इंडिया हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंटस असोसिएशन
(AHAR), इंडियन फेडरेशन ऑफ कुलिनरी असोसिएशन (IFCA), इ. नॅशनल लेवल ऑर्गनायझेशन्स यांनी
नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती असाव्या.
ग्राहक संस्थेचे ०२ प्रतिनिधी - ग्राहक संस्थाचे ०२ प्रतिनिधी हे स्वतंत्र व सामाजिक क्षेत्रात कार्यरत
असलेले कंझ्युमर राईटस अॅक्टीव्हिस्ट किंवा रिजनल/स्टेट चॅप्टर्स ऑफ नॅशनल लेवल कंझ्युमर्स
ऑर्गनायझेशन्स् यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती असाव्या.
तरी पात्र इच्छुक सदस्यांनी दिनांक 16 जुलै, 2024 पर्यंत संपर्क
साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन जळगाव या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००००००
No comments:
Post a Comment