जळगाव दि.5 ( जिमाका ) - महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आलेली होती सदर गठित समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण य कृती आराखंडा २०२२ मसुदा तयार केलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ हा इग्रजी य मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाचे https://womenchild.maharashtra.gov.in https://www.wedcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. तरी सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेला असुन त्यांचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. सदर बाल धोरण व कृती आराखडा यामध्ये आवश्यक बाबी, सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुदयामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सुचना नागरीकांकडून मागविण्यात येत आहे.
प्रस्तावित महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृतो आराखडा २०२२ च्या संदर्भाने नागरीकांच्या हरकती व सूचना दिनांक ३० जून २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजे पर्यंत महिला व बाल विकास आयुक्तालय, २८ राणीच्या बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ पुणे ०१ या पत्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठविण्यात याव्यात असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment