जळगाव, दि. १३ (जिमाका वृत्तसेवा) :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत जळगाव येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह, सिंधी कॉलनी, जळगाव येथे वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षाकरीता कनिष्ठ महाविदयालय इयत्ता ११ वी साठी प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह ,जळगाव यांनी केले आहे.
प्रवेशित विद्यार्थ्यांना
शासनाकडून नाश्ता, भोजन, निवास, निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्य व संगणक सुविधा व
वायफाय सुविधा व इतर सोयी सुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात. ज्या
विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन
नमुद दिनांकापर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित
शासकीय वसतीगृहातील गृहपाल एस. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन गृहपाल,
मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
000000000
No comments:
Post a Comment