जळगाव, दि. २६ (जिमाका वृत्तसेवा) :- महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी बापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा व्दैवार्षिक सन २०२१-२३ करीता (बारा वर्ष अभियान राबविणेबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. तरी सर्व कार्यान्वित पाणी वापर संस्था यांनी या पुरस्कार स्पर्धत सक्रीय महभाग घ्यावा,
सदर
स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येणार असून या स्पर्धेसाठी १. लघु पाटबंधारे प्रकल्प,
मध्यम पाटबंधारे प्रकल्प, मोठे प्रकल्प,
कोल्हापूर पदधतीचा बंधारा व साठवण तलाव यावरील
कार्यान्वित असलेल्या पाणी वापर संस्थाकडून नामांकने मागविण्यात येत आहेत या
स्पर्धेसाठी इच्छुक पाणी वापर संस्थानी सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कार्यकारी
अभियंता यांचेकडे १० जूलै, २०२४ च्या आत नामांकन (प्रस्ताव) दाखल करावीत.
सदर
योजनेअंतर्गत मोठे पाटबंधारे प्रकल्प, मध्यम पाटबंधारे प्रकल्प, लघु पाटबंधारे
प्रकल्प, कोल्हापुर पदधतीचा बंधार व साठवण तलाव या प्रत्येक गटातील प्रकल्पावरील
प्रथम, व्दीतीय, तृतीय क्रमांकाच्या पाणी वापर संस्थाची निवड करण्यात
येईल असे एकूण १५ पुरस्कार राज्य स्तरावर
देण्यात येतील सदरच्या प्रत्येक गटामध्ये
पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक रु पाच लाख
व्दीतीय
क्रमांक रु तीन लाख व तुतीय क्रमांक-रु एक लाख या प्रमाणे राहील.
तसेच
सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पाणी वापर संस्था यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन
मा, कार्यकारी संचालक, तापी पाटबंधार विकास महामंडळ, जळगांव अध्यक्ष (खान्देश
प्रदेश) यांनी केले आहे.
सदर
नामांकन (प्रस्तावासाठीचे) विहीत नमुन्यातील प्रपत्र सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित
कार्यकारी अभियंता/उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता अ.गि.कुलकर्णी जळगांव
पाटबंधारे विभाग, जळगांव तथा सदस्य सचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर
संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा खान्देश प्रदेश स्तरीय समिती यांनी केले आहे.
000000000
No comments:
Post a Comment