जळगाव, दि. १३ (जिमाका वृत्तसेवा) :- दिनांक १२ जून, २०२४ रोजी तहसिल कार्यालय, भुसावळ येथे तहसिलदार भुसावळ यांचे अध्यक्षते खाली शैक्षणिक विदयार्थ्यांना तहसिल कार्यालय / उपविभागीय अधिकारी कार्यालया मार्फत निर्गमित होणारे उत्पन्न दाखले/ डोमोसाईल / नॅशनेलिटी / जातोचा दाखला/नॉन क्रिमीलेअर/EWS इत्यादी दाखले विहीत वेळेत उपलब्ध होणे कामी महा राज्यस्व अभियान अर्तगत शाळा महाविदयालयामध्ये विशेष शिबीर आयोजन करणे संबधी बैठक आयोजीत केलेली होती. सदर बैठकीस गटशिक्षण अधिकारों / शाळेचे मुख्याध्यापक / सेवा / सेतु केंद्र चालक हे उपस्थित होते.
दिनांक १८ ते १९ जून २०२४ रोजी या
कालावधीत खालील दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे शाळा / महाविदयालयात दाखले बाबत विशेष
शिबीर आयोजीत करणेत आलेले आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे
शिबीराचा दिनांक व वेळ – १८ जून, २०२४ शाळा / माहविदयालयाचे नाव - पि. ओ. नाहाटा कॉलेज भुसावळ, ङि एल. हिन्दी हायस्कूल भुसावळ , के. नारखेडे
विदयालय भुसावळ, तहसलि कार्याल अधिकारी यांचे नाव - शोभा घुले नायब तहसिलदार , अंगद असटकर, नायब तहसिलदार, हेमंत गुरव, नायब
तहसिलदार , सेवा चालकांचे नाव राहुल सपकाळे , राकेश चव्हाण, प्रमोद महाजन,
१९ जून, २०२४ रोजी दा.दे.ना. भोळे महाविदयालय
भुसावळ, प.क. कोटेचा महिला महाविदयालय भुसावळ, महात्मा गाधी विदयालय, भुसावळ तहसलि कार्यालय अधिकारी यांचे नाव - शोभा घुले नायब तहसिलदार , अंगद असटकर, नायब तहसिलदार, हेमंत गुरव, नायब तहसिलदार , सेवा
चालकांचे नाव आकाश ढाके, राकेश चव्हाण, सविता वानखेडे ,
तहसिल कार्यालयातर्फे सर्व शालेय विदयार्थी
व पालकांना अवाहान करण्यात येते की, शालेय प्रवेशाकरीता आवश्यक असलेले दाखले काढणे
कामी आवश्यक ते कादपत्रासह शाळेच्या / महाविदयालयाच्या मुख्याध्यापक / संबधीत
कर्मचारी यांच्याशी संपर्क साधुन दाखले वितरण शिबीराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा
असे आवाहन तहसिलदार भुसावळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000000000
No comments:
Post a Comment