Tuesday, 18 June 2024

पदवीधर कर्मचाऱ्यांना २६ जून रोजी मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

जळगाव, दि. १८ (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने दि. 24 मे, 2024 नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 ची घोषणा केलेली आहे. सदर निवडणूकी करिता 26 जून, 2024 रोजी मतदान होणार आहे. 

  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या दिवशी म्हणजेच दि. 26 जून, 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजुर करण्यात आली आहे. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असे  उप आयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांनी कळविले आहे.               

                                                                             ०००००

No comments:

Post a Comment