जळगाव, दि.७ (जिमाका वृत्तसेवा) : - जिल्हयात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकीविरुदध अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाने मोहीम तीव्र केलेली आहे. या मोहीमेअंतर्गत गोपनीय माहीतीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव यांचे पथकाने बुधवार दिनांक ५ जून, २०२४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर बोदवड रोड, बोदवड शहराजवळ सापळा रचलेला होता. त्यासुमारास संशयित वाहन क्रमांक MH१९ CV ७८८८ Maruti Suzuki Ertiga या वाहनाला प्रतिबंधीत अन्न पदार्थाची चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयावरुन् थांबविले. सदर वाहनाचे वाहनचालकाकडे चौकशी केली असता त्याचे नाव अभिषेक ज्ञानेश्वर बारी, राहणार जामनेर, ता. जामनेर जि. जळगाव असे सांगितले व त्या वाहनाची थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पादन, साठा वितरण, विक्री व वाहतुकीकरीता प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू या अन्न पदार्थाचा साठा आढळून आल्यामुळे बोदवड पोलीस स्टेशन येथे आणून पानमसाला व सुगंधीत तंबाखू यांचा वाहनासह एकूण साठा रु. ७,२८,०५०/- जप्त करुन वाहनचालक, क्लीनर, वाहन मालक व साठा मालक व पुरवठादार बोदवड पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आलेला आहे.
000000000
No comments:
Post a Comment