Wednesday, 19 June 2024

जळगाव शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्रात मुकबधीर, अंध अस्थिव्यंग मुलांना प्रवेश प्रक्रिया सुरु

         जळगाव दि. 19 ( जिमाका ) :- शासकिय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्र, सिंधी कॉलनी, मेहरूण रोड जळगांव या निवासी संस्थेत २०२४-२५ या वर्षाकरीता ६ ते १४ वर्षे या वयोगटातील मुकबधीर, अंध अस्थिव्यंग प्रवर्गातील मुलांना प्रवेश देणेकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याकरीता विहीत नमुन्यातील अर्ज          दि. ३०जून, २०२४ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्ज परिपुर्ण भरून दिनांक १५ जुलै, २०२४ पर्यंत कार्यालयात सादर करावेत.

            या संस्थेत शासनामार्फत मोफत निवास, भोजन गणवेश क्रमिक पुस्तके, शालेय साहित्य औषधोपचार, शालेय शिक्षणाची व्यवस्था केली आहे. प्रवेशित विद्यार्थी हा अंध, कर्णबधीर, किंवा अस्थिव्य यापैकी एकाच प्रकारचे अपंगत्व असणारा आवश्यक आहे. त्यास कोणत्याही संसर्गजन्य आजार असू नये अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या प्रती पाठवाव्यात.

१) जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दिव्यांगत्व असल्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र तसेच मुकबधीर प्रवर्गासाठी श्रवणालेख आवश्यक आहे.

२) विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, आधारकार्ड, युडीआयडी कार्ड.

३) उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला.

४) दिव्यांगत्व दिसेल असे ०५ फोटो

वरील प्रमाणे कागदपत्रांसह अर्ज भरून कार्यालयात सादर करावे, असे आवाहन अधिक्षक मानसी वाझट शासकिय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र केंद्र जळगांव यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment