जळगाव, दि.७ (जिमाका वृत्तसेवा) : - अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०१ अंतर्गत अन्न व्यवसाय करणा-या उत्पादक आस्थापनांना अन्न व औषध प्रशासन, म.राज्य, जळगाव कार्यालयातर्फे आवाहन करण्यात येते की, सन २०२३- २०२४ या महसूल वर्षापासून वार्षिक परतावा फॉर्म डी-१ मध्ये भरण्यासाठी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर आपला परवाना अर्ज करतेवेळीचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन https://foscos.fssal.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पदधतीने करावयाचा आहे. त्यामुळे या वर्षापासून ग्राहकांना डी-१ फॉर्म भरण्यासाठी कार्यालयात ईमेल करणे वा कार्यालयात समक्ष येण्याची आवश्यकता नाही. तसेच, अन्न व्यावसायीकांनी संकेतस्थळावर युजर आयडी वा पासवर्ड माहित नसल्यास https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जावून forget password or login ID टाकून नविन login ID व password generate करावा व त्यानंतर अन्न व्यावसायीकांचा वार्षिक परतावा फॉर्म डी-१ सादर करावा. तसेच वार्षीक परतावा भरण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र.१८००११२१००० अथवा helpdesk-foscos@fssai.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.
000000000
No comments:
Post a Comment