जळगाव, दि. १४ (जिमाका वृत्तसेवा) :- महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्ग/ विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी ( भटक्या जमाती क – पंडीत दीनदयाल उपाध्याय स्व्यम योजनेचा लाभ घेणारे धनगर समाजाचे विदयार्थी वगळून) विदयार्थ्यांना सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षापासून इ. १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण व व्य्वसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविदयालयांमध्ये केंद्रिभुत प्रवेश प्रक्रियेव्दारे व्दतीय , तृतीय, चतुर्थ वर्षात (प्रत्येकी १५० ) प्रवेश घेतलेल्य परंतु श्ररसकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या एकूण ४५० विदयार्थ्यांना गुणवत्तेनुसार भोजन, निवास, निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठभ् विदयार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट रक्कम जमा करणेकरीता शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ( भटक्या जमाती क- पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेचा लाभ घेणारे धनगर समाजाचे विदयार्थी वगळून ) सुरु केलेली आहे.
इतर मागास प्रवर्ग/ विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी ज्ञानज्योजी सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत लाभासाठी विदयार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज भरुन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर महाबळ जळगाव येथे दिनांक १५ जुलै, २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगाव योगेश पाटील यांनी केले आहे. सदरच अर्ज ऑफलाईन असून कार्यालयात उपलब्ध आहे . सविस्तर माहिती साठी विदयार्थ्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही सहाय्यक संचालक योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000000000
No comments:
Post a Comment