जळगाव दि.5 ( जिमाका ) - स्वयंसेवकाची दोन दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या सपन्न बालविवाह वेळीच रोखले जावे किंवा बालविवाह होऊच नये या दृष्टीने जिल्हा प्रशासन जळगाव महिला व बाल विकास विभाग, जळगाव व युनिसेफ व एस. बी. सी. ३ याच्या संक्युक्त विद्यमाने बालविवाह निर्मुलन जिल्हा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील विद्यार्थी व पालक हे बालविवाह या विषयात जागृत व्हावे व त्याच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बाल विवाह मुक्त व्हावा या उद्देशाने धुळे जिल्ह्यातील ४० व जळगाव ४० व नाशिक ४० जिल्ह्यातील असे एकूण १२० स्वयंसेवकाचे दोन दिवसीय प्रशिक्षण दिनांक २७ व २८ मे, २०२४ या कालावधीत हॉटेल गणपती येथे सपन्न झाले
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मा हेमतराव
भदाणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.क.) धुळे होते तर उपाध्यक्ष मा. गिरीश जाधव
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धुळे हे होते तसेच प्रशिक्षणास विशेष मार्गदर्शक
म्हणून मा सतीश चव्हाण (जिल्हा बाल सरक्षण अधिकारी, धुळे), मा सोनाली मुखर्जी
(युनिसेफ राज्य सल्लागार) मा निशित कुमार (संस्थापक एस. बी सी ३), मा नदू जाधव
(राज्य समन्वयक- एस. बी. सी. ३), मा. कृपाली बिडये (वरिष्ठ समन्वयक एस बी सी. ३)
तसेच मा सोनिया हंगे (वरिष्ठ समन्वयक- एस बी सी ३) याचे विशेष मार्गदर्शन लाभले.
दोन दिवसीय कार्यशाळेत बालविवाहाचे
कारणे, परिणाम व उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलांचे हक्क
मुलभूत अधिकार, लिंगभाव व पितृसत्ता, सवाद व कृती कौशल्य, बालविवाह प्रतिबंधक
कायदा व अधिनियम २००६. लैगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा २०१२ या सर्व
आवश्यक बाबींवर विशेष प्रशिक्षण देण्यात आले त्याच बरोबर शाळा स्तरावर सत्र
घेण्यासाठी आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले
दोन दिवसीय कार्यशाळेला एकूण ३ सस्था
उपस्थित होत्या १) नवजीवन सामाजिक संस्था नाशिक २)छ. राजर्षी शाहू महाराज
बहुउदेषीय सस्था मालेगाव, ३) साने गुरुजी सामाजिक संस्था अमळनेर या तिन्ही सस्थाचे
स्वयसेवक, पर्यवेक्षक व संस्थापक प्रशिक्षणास हजर होते सदर प्रशिक्षणात धुळे
जिल्ह्यातील १२५ शाळेमध्ये बाल विवाह निर्मुलन सत्र घेणेबाबत नियोजन करण्यात आले.
प्रशिक्षांचे सपूर्ण नियोजन रुचिका इगळे व श्रीकात भोरे (जिल्हा समन्वयक- एस बी.
सी. ३) यानी केले व प्रशिक्षणाचे तात्रिक कार्य रुचिका अहिरे यांनी साभाळले
सरतेशेवटी मा. गिरीश जाधव (जी म. बा. धुळे) यानी सर्व स्वयसेवकाना बालविवाह
निर्मुलन बाबत प्रतिज्ञा देऊन प्रशिक्षणाचा समारोप केला, असे बालविवाह निर्मुलन
जिल्हा कृत दल तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी एक
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
000000
No comments:
Post a Comment