जळगाव, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छात्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील क्र. ७५३ एफ डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठया पुलाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झालेला असुन सदर पुल हा पुर्णपणे जिर्ण झालेला आहे.
त्यामुळे
सदर पुल वाहतुकीकरिता धोकादायक झालेला असुन या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवीत हाणी
होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे व जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या
महामार्गाची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
पोलीस
अधीक्षक जळगाव यांच्या पत्रान्वये काढण्यात आलेल्य अधिसुचनेनुसार जामनेर
तालुक्यातील मौजे वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या
मार्गावरील डाव्या बाजुने असलेला जुना मोठा पुल हा रविवार दि. १६ जून, २०२४ पासून
पुलाची दुरुस्ती होई पर्यंत बंद करण्यात येत आहे.
पर्यायी बदल
पर्याय
क्र. ०१- अ) - जड वाहतुक (दुहेरी
वाहतुक मार्ग) – नेरी - एरंडोल-
चाळीसगाव –नांदगाव- शीरुर बंगला- छत्रपती संभाजीनगर , ब) जळगाव (अजिंठा चौफुली) – मुक्ताईनगर- मलकापुर-
बुलढाणा-जालना- छत्रपती संभाजीनगर ,
हलकी
वाहतुक – पर्यायी मार्ग (एकेरी वाहतुक मार्ग) अ)- जळगाव ते छत्रपती
संभाजीनगर , जळगाव -पहुर- वाकोद- फर्दापुर - छत्रपती संभाजीनगर ,
ब)
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव - छत्रपती
संभाजीनगर - फर्दापुर - फर्दापुर तांडा (सोयगाव
रोड) वरखेडी तांडा फाटा- वाकोद – पहुर असा
बदल करण्यात मंजूरी दिली आहे, असे कार्यकरी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग
जालना यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment