जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने 2022-23 या वर्षाकरीता उन्हाळी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळी प्रशिक्षण शिबीर 20 एप्रिल ते 04 मे, 2022 या दरम्यानआयोजित केले असून सदर प्रशिक्षण शिबीर हे 08 ते 17 वयोगट मुले/ मुली करीता विनामुल्य आहे.
सदर
प्रशिक्षणात खो –खो व हॉकी यां खेळांचा
समावेश असून खो-खो सकाळी 7 ते 9 तर हॉकी सायंकाळी 5 ते 7 या वेळात
खेळावला जाईल. श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव या ठिकाणी
आयोजित खो-खो खेळासाठी मिनल थोरात तर हॉकी साठी अरविंद खांडेकर हे प्रशिक्षक
म्हणून काम करतील,
तरी
इच्छुक खेळाडुनी अधिक माहिती व नोंदणीसाठी 18 एप्रिल, रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, जळगाव येथे श्री.
मिनल थोरात व अरविंद खांडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment