जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 11 :- महात्मा ज्योतीराव फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसीलदार सुरेश थोरात, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, नायब तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment