जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत राज्यात नाविन्यपुर्ण कल्पनांना पाठिंबा देण्याचे उद्देशाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व सिस्को लाँचपॅड च्या सहकार्याने भारताच्या टेक्नोप्रेन्योरशिप मालिकेच्या महाराष्ट्र आवृत्तीचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात सुरवातीच्या टप्प्यात तरुण विद्यार्थ्यांसाठी स्टार्ट –अप
व्यवसाय उद्योजकतांसाठी आधारित ज्ञान सत्र, आणि तंत्रज्ञान आयोजित केले जाईल जेथे
शिर्ष नवोदित आणि स्टार्ट – अप्सना त्यांच्या कल्पना संबंधित भागधारकांपर्यत
पोहोचविण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल.
ज्ञानसत्र उद्योग आणि पर्यावरणातील तज्ञांव्दारे दि. २५ ते २९ एप्रिल, २०२२ व दि.
२ ते ६ मे,२०२२ या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या
उपक्रमाव्दारे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीव्दारा एक व्यासपीठ उपलब्ध करुन
देण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेथे नवोदित आणि
उद्योजकांना त्यांची कल्पना कशी तयार करावी. टिकवुन ठेवावी. विस्तारीत व्हावे आणि
मोठे कसे करावे याचे ज्ञान दिले जाईल. तसेच या कार्यक्रमात उत्पासद विकास, डिझाइन
विचार, तंत्रज्ञान व आर्थिक व्यवस्थापन व्यवसाय ज्ञानाचा एक भाग म्हणून निधी कसा
उभारावा यासारख्या विस्तृत विषयांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील उत्सुक
उद्योजक, विद्यार्थी आणि सुरवातीच्या टप्प्यातील स्टार्ट-अप्सचे संस्थापक
यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिका चौकशीसाठी technopreneurship@cisco.com
वर संपर्क करावा.
०००००
No comments:
Post a Comment