जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा)
:- सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता
कार्यक्रम दिनांक6 ते 16 एप्रिल, 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या
माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने वक्तृत्वास्पर्धा व
निंबधस्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या करीता सहभाग घेणाऱ्या इच्छुक स्पर्धकांनी
खाली दिलेल्या तपशिला नुसार भाषणाचे व्हिडीओ
सुस्पष्ट आवाजासह तसेच लेखी
निबंध PDF स्वरुपात मोबाईल नं. 8668758663
या WhatsApp No वर दि. 30 एप्रिल, 2022 पर्यंत पाठवावेत तसेच स्पर्धकांनी व्हिडीओ
पाठवितांना खालील माहिती देखील सोबत दयावी
– नाव, संपर्क क्रमांक, पत्ता, स्पर्धेचे नाव, स्पर्धेचा गट, विषय,
विषय
नमूद करणे आवश्यक आहे. सदर स्पर्धेत
प्रत्येक गटातून तीन स्पर्धेकांसाठी
पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येईल
वक्तृत्व
स्पर्धा- इ. 6 वी ते 8 वी- ( वेळ मर्यादा 3 मिनिंट) 1) मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय 2) लोकशाहीत समतेचे महत्व इ. 9 वी ते 10 वी (
वेळ मर्यादा 5 मिनिट)
1)अरे
माणसा माणसा कधी होशील माणूस 2) डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग - इ. 11 वी ते 12 वी (वेळ मर्यादा – 7 मिनिट)
1)
समतेचे हे तुफान ऊठवू 2) सामाजिक न्याय
आणि समता, पदवी व पदवीत्तर ( वेळ मर्यादा – 9 मिनिट )
1)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत
2) आधुनिक राष्ट्र उभारणी महात्मा
फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, शिक्षक व
शिक्षकेत्तर –
(
वेळ मर्यादा – 10 मिनिट )
1) गर्दीत
माणसांच्या माणूस शोधतो मी 2) समता: लोकशाहीतील महत्व, दशा आणि दिशा
2) निबंध स्पर्धा - इ– 6 वी ते 8 वी- (350 शब्द)
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलु 2) महापुरुषांची गाऊ गाथा, आदराने टेकवू माथा - इ. 9 वी ते 10 वी ( 500 शब्द)
1)समाजसुधारक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) मानवता हाच धर्म
माणुसकी हीच जात - इ.11 वी ते 12
वी ( 700 शब्द)
1)
समता : सामाजिक वास्तव एक चिंतन 2)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पदवी व पदवीत्तर ( 1000 शब्द,)
1) घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) स्वातंत्र समता बंधुता : परस्पर संबंध, शिक्षक व शिक्षकेत्तर – ( 1000 शब्द,
1)
वर्ग, वर्ण, लिंग आणि जात: सामाजिक परिभाषा
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता… काल, आज आणि
उद्या,
सदर स्पर्धेत प्रत्येक गटातून तीन
स्पर्धेकांसाठी पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त समाज
कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment