जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) - जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या व्दारे जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2020 जाहिर करण्यात आलेला आहे.
पुरस्काराचा प्रकार - (1) जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक
पुरस्कार वेसबॉल
पुरस्कारर्थीचे नाव – श्री. अजय
गोपाळराव देशमुख – कार्याचा तपशिल – यांचा बेसबॉल हा खेळ असुन त्यांनी
ज्युनिअर सीनीअर राष्ट्रीय बेसबॉल चॅम्पीयन, सिनिअर पुरुष गट राज्यस्तर व राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा,
राष्ट्रीय व राज्यस्तर शालेय बेसबॉल स्पर्धा मध्ये प्राविण्या प्राप्त करणारे अनेक
खेळाडु घडविलेले आहेत. ते राष्ट्रीय विदयालय ज्यु. कॉलेज स्टेशन रोड चाळीसगाव जि.
जळगाव येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
(2) जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार
पुरुष ( सॉफटबॉल) – कल्पेश ईश्वर जाधव
– यांचा सॉफटबॉल हा खेळ असुन त्यांनी 6 वी एशीयन ज्युनिअर ) 19 वर्षातील) मेन सॉफटबॉल
चांमपीयनशिप, ऑल इंडिया युनिव्हरसीटी
सॉफटबॉल स्पर्धा, वरीष्ठ राष्ट्रीय मेन सॉफटबॉल चांमपीयनशिप, कनिष्ठ
राष्ट्रीय सॉफटबॉल चांमपीयनशिप, सीनिअर राज्यस्तर सॉफटबॉल चॅम्पीयनशिप
स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेले आहे. हा खेळाडू व जळगाव जिल्हयाचा रहिवासी
आहे.
3)
जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला ( सॉफटबॉल) शिवानी राजेंद्र देशमुख – यांचा सॉफटबॉल हा खेळ असुन त्यांनी सीनिअर
राष्ट्रीय सॉफटबॉल चॅम्पीयनशिप, ज्युनिअर राष्ट्रीय सॉफटबॉल चॅम्पीयनशिप, सीनिअर
राज्यस्तर सॉफटबॉल चॅम्पीयनशिप स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेले आहे. हा
खेळाडू जळगाव जिल्हयाची रहिवासी आहे.
(4)
जिल्हा गुणवंत खेळाडू थेट पुरस्कार (04 खेळाडू पात्र ठरलेले आहेत) शासन निर्णयातील
नियम क्र. 6 मधील (V) आंतरराष्ट्रिय स्पर्धेत सहभागी खेळाडूस जिल्हा क्रीडा
पुरस्कार थेट देण्यात यावा. असा पुरस्कार जादाचा समजण्यात यावा असे नमुद कलेले
आहे. 1)चित्रा राजेद्र नाईक (2)सुरभी
मिलींद दर्प
(3)
सई अनिल जोशी - शासन निर्णयतील नियम क्र.
6 मधील (V) 1. मधील एशियन गेम्स या स्पर्धेचा समावेश आहे. ही खेळाडू 11 वी एशियन
वुमेन सॉफटबॉल चॅम्पीयनशिप तायवान दि. 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2017 स्पर्धेत
सहभागी झालेली आहे. थेट पुरस्कारा साठी ती
पात्र ठरलेली आहे.
(४) सुमेध प्रदिप तळवेलकर – शासन निर्णयातील नियम क्र. 6 मधील (V) मुद्दा
क्र.5 मधील एशियन अजिंक्यपद स्पर्धा (वरीष्ट गट) या स्पर्धेचा समावेश आहे. 10 वी आशियाई मेन सॉफटबॉल चांम्पीयनशिप
तायवान दि. 23 ते 28 एप्रिल 2018 स्पर्धेत
हा खेळाडू सहभागी झालेला आहे. हे थेट पुरस्कारा साठी ते पात्र आहे.
सदर वरील जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थीना
दि. 1 मे, महाराष्ट्र दिन 2022 रोजी पोलीस मुख्यालय जळगाव येथे होणाऱ्या
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा प्रसंगी मा. पालकमंत्री महोदयांच्या शुभहस्ते पुरस्कार
सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
सदर
चारही पुरस्कारार्थीचे मा. अभिजीत राऊत जिल्हाधिकारी जळगाव तथा अध्यक्ष क्रीडा
पुरस्कार समिती जळगाव श्रीमती सुनंदा पाटील
उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग नाशिक, तथा सदस्य जिल्हा क्रीडा
पुरस्कार समिती जळगाव श्री. प्रशांत राजाराम जगताप जिल्हा क्रीडा
पुरस्कारार्थी सदस्य जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव डॉ. प्रदिप प्रभाकर
तळवेलकर शिवछत्रपती पुरस्कारार्थी सदस्य जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव,
श्री. मिलिंद दिक्षित जिल्हा क्रिडा अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा क्रीडा
पुरस्कार समिती जळगाव श्रीमती सुजाता गुल्हाने क्रीडा अधिकारी जळगाव यांनी व
क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. असे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित
यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment