जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा)- शालेय शिक्षण, महाविदयालय, क्लासेस तसेच प्रवासी वाहतूक व्यवस्था या ठिकाणी मुलींवर अत्याचार रोखण्यासाठी परिवहन विभागाने उपाययोजना करणेबाबत संदर्भिय पत्राव्दारे निर्देश दिलेले आहेत.
स्कूल बस नियमावलीमधील तरतुदीनुसार
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शालेय स्तरावर स्कूलबस परिवहन समिती नियुक्त करण्यात
आलेल्या आहेत. यासर्व शाळेतील परिवहन समितीमार्फत स्कूल बसमधून शालेय मुलींची
सुरक्षितपणे वाहतूक होण्यासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी
महिलाविषयक कायद्यांची माहिती सर्व शाळांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थीनींना
द्यावी व याबाबत जनजागृती करावी.
मुलींची
ने- आण करीत असलेल्या 12 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेल्या स्कूल बसमध्ये स्त्री
सहवतींची नेमणूक करणे बंधनकारक असून, याबाबतची खातरजमा शिक्षण विभाग, परिवहन विभाग
व पोलीस विभाग यांनी करावी तसेच सर्व स्कूलबस वाहतूकदार व शालेय व्यवस्थापक यांनी
त्यांच्या स्कूल बसेसमध्ये महिला सहवतींची नेमणूक करावी.
ऑटोरिक्षा,
टॅक्सी व खाजगी बसेसमधुन महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व संबंधित
वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या सर्व सदस्यांना महिला प्रवाशांना
त्रास व अत्याचार होणार नाही यांबाबत विशेष काळजी घेण्याबाबत सूचना द्याव्यात
ऑटोरिक्षा,
टॅक्सी व खाजगी बसेसमधुन प्रवास करतांना वाहनधारकांकडून / चालकाकडून / वाहकाकडून
महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे
दाखल करण्यात येतो. अशा चालकांची वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती व परवानाधारकाचे
परवाना निलंबन / रद्द करण्याबाबतची कार्यवाही परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येईल
याबाबतची संबंधितांनी नोंद घ्यावी. स्कूलबस, ऑटोरिक्षा, टॅक्सी व खाजगी
बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तक्रार
करण्यासाठी महिला हेल्पालाईन् 102 वर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम
लोही यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment