Monday, 18 April 2022

बहिणाबाई महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन व जनजागृती भारत सरकारच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व् गोवा राज्य) यांच्या मार्फ़त लोककलेचा जागर

        जळगाव :- भारत सरकारच्या महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे व क्षेत्रिय लोक संपर्क ब्युरो, जळगाव यांच्या वतीने बहिणाबाई महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन व जनजागृती करण्यात येणार आहे. दिनांक 18 ते 25 एप्रिल दरम्यान महोत्सवाचे ठिकाण त्याच बरोबर पहुर, नेरी (ता. जामनेर), पल्हाढी, बांभोरी  (ता. धरणगाव), शेलगाव, खेडी, नाशिराबाद, कुसुंबा (ता. जळगाव) आदी ठिकाणी भारत सरकारच्या मान्यता प्राप्त कलासंस्था शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी मंच, औरंगाबाद, दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, जळगाव, आशाभी मुल्ला एंड पार्टी, सांगली व जय हिन्द लोक कला मंच, अहमदनगर या सांस्कृतिक कला पथकांद्वारा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन व जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमच्या माध्यमातून स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव, देश भक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत आदी संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

कोविड-19 चे नविन नियम पाळून स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, सर्व देशवासियांनी या लोककलेच्या जागरात सहभागी व्हावे असे आवाहन भारत सरकारच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व् गोवा राज्य) यांच्या मार्फ़त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment