जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : - भारतीय स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवात लोकांचा सहभाग वाढावा याकरीता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत दि. 6 एप्रिल, ते 14 एप्रिल, या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
यानिमित्ताने जळगाव जिल्हयातील मागासवर्गीय अनुसूचित जमाती वगळून सर्व उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी करीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव येथे कार्यरत आहे. 12 वी विज्ञान व्यावसायीक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विदयार्थी इत्यादींना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते. अर्जदार यांची कार्यालयात गर्दी कमी करुन अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरीता शासनाने ऑनलाईन सुविधा सुरु केलेली आहे. मात्र यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी येत आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्जाकरीता मोफत मार्गदर्शन वेबीनार मंगळवार दि. 12 एप्रिल, रोजी दुपारी 3 वाजता Google Meet App या ॲपवर आयोजित करण्यात आले आहे.
https:meet.google.com/hmf-qarr-kdv आणि त्याचा प्रवेशित hmf-qarr-kdv टाकूण वेबिनारला जॉईन व्हावे. यामध्ये अर्ज सादर कसे करावे. अर्ज सादर करतांना सोबत कोणते दस्ताऐवज सादर करावे. या बाबत सविस्तर मार्गदर्शन पॉवर पॉईट प्रेझेंटेशन व्दारा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच ज्या अर्जदारांना त्रुटी पुर्ततेबाबत SMS व ईमेल आलेले आहेत. अशांनी तात्काळ त्रुटी पुर्तता सादर करावी. तसेच 12 वी विज्ञान आणि CET परीक्षा देणारे अशा विदयार्थ्यांचे अर्ज सादर करणे राहिलेले असतील त्यांनी तात्काळ या आठवडयात सादर करावे. तरी वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागासप्रवर्गातील उमेदवारांनी महाविदयालयातील प्राचार्य, कर्मचारी, विदयार्थी, पालक, इंटरनेट कॅफे ईत्यादींनी सदरील वेबिनार मध्ये सहभागी होवून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन समिीतीच्या वतीने करण्यात येत आहे. असे संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment