जळगाव, दि.१३ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील गुरुवार १४ एप्रिल, २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
पालकमंत्री
श्री. पाटील यांचा दौरा असा : गुरुवार १४ एप्रिल, २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता
पाळधी येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या
भेटी व चर्चा, सकाळी ८.४५ वाजता पिंप्री ता. धरणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमत्त
आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी ९.०० वाजता चिंचपुरा ता. धरणगाव येथे शिबिराला
भेट, सकाळी ९.३० वाजता जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमत्त
पुतळयास अभिवादन, सकाळी १०.०० वाजता कानळदा ता. जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमत्त पुतळयास अभिवादन, सकाळी ११.०० वाजता म्हसावद ता. जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमत्त पुतळयास
अभिवादन, सोईनुसार पाळधी ता. धरणगाव जि. जळगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण व राखीव,
सायं ५.०० वाजता पाळधी खु. सिध्दार्थ नगर येथे
डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंती निमत्त
पुतळयास अभिवादन, सायं ५.३० वाजता पाळधी खु. फुले नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त पुतळयास अभिवादन, सायं ६ वाजता चावलखेडा येथे डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंती निमित्त पुतळयास
अभिवादन, सायं ६.३० वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावात डॉ. बाबासाहेब आबेडकर
यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पाळधी ता. धरणगाव कडे
शासकीय वाहनाने प्रयण व राखीव.
०००००
No comments:
Post a Comment