जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्यावतीने दि. 12 एप्रिल, 2022 रोजी जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी 12 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment