जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा)- जिल्हयातील मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी वर्ग यांना सुचित करण्यात येते की जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी शनिवार दिनांक 30 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता निवड चाचणी परीक्षा नियोजित करण्यात आली आहे. हया परीक्षेस जिल्हयातील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या 11831 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन नोंदणी केलेली आहे. हया सर्व परीक्षार्थ्यांनी आपले प्रवेश पत्र डाउनलोड करुन घ्यावेत व आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाची सही व शिक्का घेवून प्रवेशपत्र परिक्षेस येतांना घेवून यावे,
सदर
प्रवेशपत्र परीक्षे दरम्यान पर्यवेक्षक जमा करुन घेतील. जर विद्यार्थ्यांना प्रवेश
पत्राची प्रत हवी असल्यास झेरॉक्स कॉपी विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत ठेवावी.
मुख्याध्यापकाची सही –शिक्का असलेले प्रवेशपत्र दिनांक 30 एप्रिल, 2022 रोजी परीक्षा केंद्रावर
जमा करणे अनिवार्य आहे. यांची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्राचार्य
जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव ता. भुसावळ जि.जळगाव डॉ. आर.आर.खंडारे यांनी एका
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment