जळगाव, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यभर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्ताने दि. 6 एप्रिल, 2022 ते 16 एप्रिल, 2022 या कालावधीत राज्यभर सामाजिक समता कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. सहाय्यक आयुत समाज कल्याण या कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत दि. 14 एप्रिल 2022 रोजी
सकाळी 10.00 वाजता जिल्हा नियोजन भवन जळगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रा. सजीव सोनवणे
यांचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक न्याय ” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे औचित्याने सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ
घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे देखील
आयोजन करण्यांत आले आहे.
तरी
दिनांक 14 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे
आयोजित करण्यात आलेल्या प्रस्तूत कार्यक्रमास जिल्हयातील सर्व नागरीकांनी उपस्थित
रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज
कल्याण जळगाव योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
. 000000
No comments:
Post a Comment