Wednesday, 13 April 2022

औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे 21 एप्रिल रोजी शिकाउ उमेदवाराकरीता भरती मेळाव्याचे आयोजन

             जळगाव, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) :- जळगाव जिल्ह्यातील सर्व आय टी आय पास उमेदवार व 10 वी पास उमेदवार यांच्यासाठी जळगाव जिल्हयातील नामांकित कंपन्या दिनांक 21 एप्रिल, 2022 रोजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगाव मेस हॉल येथे Govt. ITI Jalgaon  येथे शिकाउ उमेदवारी भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरीआय टी आय पास उमेदवार व 10 वी पास उमेदवार यांनी विहित कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह व Apprenticeshipindia.org  या पोर्टलवरील प्रोफाईलच्या झेरॉक्स प्रतीसह गुरुवार दिनांक 21 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगाव मेस हॉल येथे  Govt. I.T.I.Jalgaon   येथे हजर रहावे, असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, व्दारा औदयोगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment