Friday, 9 May 2025

भरडधान्य रब्बी हंगाम 2024-2025

             जळगाव, दि. 9 मे (जिमाका): किमान आधारभूत किमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२४-२५  मध्ये ज्वारी, मका व  बाजरी (भरडधान्य) खरेदी करीता जळगांव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगांव, एरंडोल, पाळधी, म्हसावद, जळगांव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुणी, पाचोरा, भडगांव व चाळीसगांव असे एकूण १८ खरेदी केंद्र कार्यरत आहे.

पिकाचा प्रकार  - ज्वारी - ३३७१-   मका - २२५५-  वाजरी - २६२५/-

ऑनलाईन शेतकरी नोंदणी मुदतवाढ  - दि.३१ मे, २०२५ पर्यंत

जिल्ह्यात झालेली एकूण ऑनलाईन नोंदणी-६३१८ - खरेदी कालावधी दि.०१ मे, २०२५ ते दि.३० जून, २०२५

            तरी शेतकरी बंधुंनी ज्वारी, मका व बाजरी नोंदणी / खरेदीचा लाभ घ्यावा. ऑनलाईन नोंदणी करीता, आधारकार्ड, बँक पासबूक व ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८अ इ. कागदपत्रे घेवून वरील खरेदी केंद्रांवर चना, ज्वारी, मका व बाजरी नोंदणी करावी,

             असे आवाहन मा. मंत्री ना. श्री. गिरीषभाऊ महाजन व मा. ना. श्री. गुलावरावजी पाटील पालकमंत्री तसेच विभागीय संचालक मा. मंत्री महोदय श्री. संजय वामनराव सावकारे मा. उपाध्याक्ष श्री. रोहितदादा दिलीपराव निकम, मा. संचालक श्री. संजय मुरलीधर पवार साहेव तसेच श्री. एस. एस. मेने (प्र. जिल्हा पणन अधिकारी, जळगांव) यांचे मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

०००००००००

No comments:

Post a Comment