Wednesday, 21 May 2025

अनु. जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी चाळीसगाव येथे मोफत निवासी शिक्षणाची संधी ; डेराबर्डी येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज सुरू

        जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा)- : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत शासकीय निवासी शाळा, डेराबर्डी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता इयत्ता ६ वी ते १० वी (सेमी इंग्रजी माध्यम) या वर्गांमध्ये रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

            या शाळेत अनुसूचित जाती, नवबौध्द, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, दिव्यांग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यात अनुसूचित जाती – ८० टक्के, अनुसूचित जमाती – १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती – ५ टक्के, दिव्यांग – ३ टक्के, विशेष मागास प्रवर्ग – २ टक्के. असे आरक्षण देण्यात येणार आहे.

शाळेची वैशिष्ट्ये:

            नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर अत्याधुनिक सुविधा असलेली ही निवासी शाळा आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह मोफत निवास व भोजन, गणवेश, शैक्षणिक साहित्य, ई-लर्निंग, स्मार्ट टीव्ही, संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा व रात्र अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचे व रहिवासी प्रमाणपत्र

आधार कार्ड

पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र

मागील इयत्तेचे गुणपत्रक

विद्यार्थी संचयिका पुस्तिका

६ पासपोर्ट साईज फोटो

पालकाचे ओळखपत्र (आधार/मतदान/पॅन कार्ड)

वैद्यकीय तपासणी अहवाल

प्रवेशासाठी संपर्क:

श्रीमती एस. डी. महाजन (मुख्याध्यापक) – ९४०३४३४८७०

एल. पी. कोठावदे – ९४२०६९५७९३

दिलीप परदेशी – ९९७५९१७२३३

वनिता बेरड – ७०२०४३८३२१

रूपाली सोनवणे – ९०२१९८४८९८

दिपाली तडवी – ९९२२६०८८१९

अनिता तोंडे – ७७५६८४०५९६

            यांच्याशी संपर्क साधत विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव – श्री योगेश पाटील यांनी केले आहे.

०००००००००


No comments:

Post a Comment