जळगाव, दि. 9 मे (जिमाका) - महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र तसेच जळगाव जिल्हा खो-खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने खो-खो या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देणे, विविध आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करणे आणि खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर नेणे हा मुख्य उद्देश होता. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २६ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत करण्यात आले.
या शिबिरास शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारप्राप्त क्रीडा मार्गदर्शक गणपतदादा पोळ सर यांनी भेट देऊन उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. शिबिरांच्या समारोप प्रसंगी जिल्हा खो खो क्रीडा प्रशिक्षण केंद्रांतर्गत सराव करणा-या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी उपलब्ध करुन दिलेले क्रीडा गणवेश शिवछत्रपती पुरस्काची गणपतराव पोळ यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी पोळ यांचा सत्कार केला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचे सहसचिव जयांशु पोळ, राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, क्रीडा अधिकारी सुरेश थरकुडे, जळगांव जिल्हा खो खो संघटनेचे सचिव राहुल पोळ तसेच राष्ट्रीय पंच दिलीप चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छगन बारेला, केतन चौधरी, चैतन्य पोळ, मोहित, प्रथमेश, हिंमाशु यांनी सहकार्य केले.
0000000000
No comments:
Post a Comment