Friday, 2 May 2025

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत विशेष शिबीराचे आयोजन ▪️८ ते १६ मेदरम्यान जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी होणार शिबिरे

जळगाव, दि. २ मे (जिमाका वृत्तसेवा) –जळगाव लोकसभा मतदारसंघातील ६० वर्षांवरील वयोवृद्ध व्यक्तींना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण संस्था (अलिम्को), मुंबई व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १६ मे २०२५ या कालावधीत विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव शहर व ग्रामीण भागासाठी ८ मे २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत शिबीर होणार असून, उर्वरित तालुक्यांतील शिबिरे खालील प्रमाणे आयोजित करण्यात आली आहेत –

एरंडोल – ९ मे, पारोळा – १० मे, अमळनेर – १२ मे, धरणगाव – १३ मे, पाचोरा – १४ मे, भडगाव – १५ मे, व चाळीसगाव – १६ मे.

संबंधित तालुक्यांमध्ये ही शिबिरे ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात येणार आहेत.

या शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांना कर्णयंत्र, व्हीलचेअर, कमोड चेअर, नी-ब्रेस, वॉकींग स्टीक, ट्रायपॉड, वॉकर, कृत्रिम दात, चष्मे इत्यादी सहाय्यक साहित्य मोफत प्रदान करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांनी आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट साईझ फोटो यांची झेरॉक्स प्रत शिबीर स्थळी सोबत आणणे आवश्यक आहे. लाभासाठी लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी शिबीरात केली जाणार आहे.

सदर शिबिरांचे आयोजन राष्ट्रीय वयोश्री योजना (सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार) अंतर्गत करण्यात आले असून, योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय राससिंग (जिल्हा परिषद, जळगाव) यांनी केले आहे.

                                                                  00000000000


No comments:

Post a Comment