जळगाव दि. 28(जिमाका) :- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया मध्ये खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत सोयाबीन पिकांचे अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा या बाबी राबविण्यात येणार आहेत.
याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी
पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटीच्या
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर बियाणे, औषधे, खते या मथळ्या
अंतर्गत बियाणे घटकामध्ये सोयाबीन पिकासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिकासाठी
शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या घटकासाठी अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी /उपविभागीय कृषि अधिकारी तालुका कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा व
तरी जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी योजनेचा लाभ घ्यावा
असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment