Thursday, 22 May 2025

फलोत्पादन विकासासाठी ‘बहुपीक उच्च मूल्य गट’ व ‘शहरलगत भाजीक गट’ प्रकल्प; अंमलबजावणी यंत्रणेसाठी इच्छुकांना अर्ज करण्यासाठी 31 मे मुदतवाढ

         जळगाव, दि. 22 मे (जिमाका वृत्तसेवा): राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत 2021 पासून सुरू असलेल्या फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमाअंतर्गत आता नवीन दोन प्रकल्प – बहुपीक उच्च मूल्य गट (Multi-commodity High Value Cluster) आणि शहरलगत भाजीक गट (Peri-urban Vegetable Cluster) राबविण्यात येणार आहेत. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प अंमलात आणले जाणार असून, अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करण्यासाठी पात्र संस्थांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            या योजनेंतर्गत निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO/FPC) प्रक्रिया केंद्रे, शीतगृह (कोल्ड स्टोरेज), वाहतूक साधने यांसह विविध आधुनिक पायाभूत सुविधांसाठी अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना मूल्यसाखळीत सामील करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा उद्देश आहे.

बहुपीक उच्च मूल्य गटाची वैशिष्ट्ये:

            शेतीपूर्व तयारी, लागवड साहित्य, सिंचन, कीड नियंत्रण, यांत्रिकीकरण यांचा समावेश

काढणीनंतर व्यवस्थापन, मूल्यवर्धन, पॅकेजिंग, ब्रँडिंग व बाजारपेठेपर्यंत लॉजिस्टिक साखळी

मुख्य पीक फलोत्पादनाशी संबंधित असावे, जमिनीचे क्षेत्र शक्य तितके सलग असावे

किमान ‘फार्मगेट मूल्य’ १०० कोटी रुपये असावे

प्रकल्पातील मुख्य पिकाच्या ‘फार्मगेट मूल्य’च्या २५% पर्यंत अर्थसहाय्य

शहरलगत भाजीक गटाची वैशिष्ट्ये:

            प्रमुख पिके: टोमॅटो, कांदा, बटाटा तसेच कोबी, फ्लॉवर, वांगी, भेंडी, शिमला मिरची, कोथिंबीर, आले, लसूण, हिरवी मिरची इ. शेतकरी व FPO/FPC यांच्याकडून लागवड साहित्य, आधुनिक शेती यंत्रणा, कीड व्यवस्थापन, सुक्ष्म सिंचन आदी बाबींची अंमलबजावणी

अंमलबजावणी यंत्रणेमार्फत शीतगृह, प्रक्रिया केंद्र, एकात्मिक पॅक हाऊस आदी पायाभूत सुविधा उभारणी

संबंधित शहरापासून ५० ते १०० किमी अंतरात उत्पादन केंद्र असणे आवश्यक

FPO/FPC घटकांसाठी ४०% पर्यंत अनुदान, तर इतर घटकांसाठी बँक कर्ज आधारित सहाय्य

महत्वाचे निकष व अटी:

अंमलबजावणी कामे विहित कालमर्यादेत पूर्ण केल्यास अतिरिक्त ५% प्रोत्साहन निधी

प्रकल्पाच्या एकूण खर्चातील ३०% पेक्षा अधिक खर्च बांधकामावर करता येणार नाही.

पात्रता निकष व मार्गदर्शक सूचना www.nhb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध

 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने या लिंकवर करावेत

            प्रथम टप्प्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 आहे. अर्ज सादर करताना येणा-या अडचणींच्या संदर्भात दि. २० मे २०२५ ते २८ मे २०२५ पर्यंत दररोज दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत ऑनलाईन पध्दतीने Daily Virtual Session चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याकरीता लिंक खालीलप्रमाणे आहे.

Meeting Link- https://nhb.webex.com/nhb/j.php?MTID=-mc3c0145b622b03ad250f05479162e9cf

Meeting number- 2519 321 0198

Password- 1234 (1234 when dialling from a video system)

            अर्जास पात्र संस्था, कंपन्या, सहकारी संस्था व इतर अंमलबजावणीस इच्छुकांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

0000000000

No comments:

Post a Comment