Tuesday, 6 February 2018

जिल्ह्यात 15 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी



जळगाव, दि. 6 - आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यात 4 फेब्रुवारी, 2018 रोजीच्या रात्री 00.05 वाजेपासून ते 15 फेब्रुवारी, 2018 रोजीच्या रात्री  11.55 वाजेपर्यंत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी राहूल मुंडके यांनी लागू केले आहेत.
अपर जिल्हादंडाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून मुंबई पोलिस अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.                             000

No comments:

Post a Comment