जळगाव, दि. 1 -
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना- 2017 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र
ठरलेल्या अर्जदार शेत-यांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी आवश्यक त्या
याद्या व रक्कमा सर्व बँकांना ऑनलाईन पध्दतीने वितरीत करण्यात आलेल्या असून
त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी सुरु असल्याची माहिती विशाल जाधवर, जिल्हा
उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे.
ही योजना राबवित असताना ज्या
प्रकरणांमध्ये बॅकांनी पुरविलेल्या कर्जखात्याच्या माहितीतील त्रुटी तसेच
शेतक-यांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीमध्ये ताळमेळ होऊ शकला नाही. अशा
प्रकरणातील माहितीची बँकेकडे असलेल्या माहितीच्य आधारे शहानिशा करुन त्याची
पात्रता व अपात्रता निश्चित करण्याची जबाबदारी तालुकास्तरीय समितीकडे सोपविण्यात
आली आहे.
यानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
जळगाव या बँकेस सद्यस्थितीत एकूण 83 हजार 663 सभासदांची यादी प्राप्त झालेली आहे.
ही यादी शेतक-यांना पाहण्यासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव या
बॅकेच्या सर्व शाखांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे.
शेतक-यांनी या यादीचे अवलोकन करुन
त्यांच्या अर्जाबाबत काही शंका असल्यास तालुका उप/ सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था
यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या तालुकास्तरीय समितीशी संपर्क साधावा. तसेच
नियमानुसार योग्य ती दुरस्ती करुन घ्यावी व कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा. असे
आवाहन श्री. जाधवर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.
०००
पाचोरा तालुक्यात कोनतीही समिती गठित नाही. पाचोरा उपनिबंधक कार्यलयात कोणताही आधीकारी तक्रार ऐकण्यास तयार नाही
ReplyDelete