Thursday, 22 February 2018

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या कार्यक्रमानिमित्त खाजगी आस्थापना कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी



        जळगाव, दि. २२ :- राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक  निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. जळगाव जिल्हयात ५८ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी तसेच १३२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीसाठी दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी निवडणूक‍ होत आहे. दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ हा कार्यालयीन कामकाजाचा दिवस असल्याने या दिवशी सार्वत्रिक तसेच पोट निवडणूकीचा कार्यक्रम लागु असलेल्या क्षेत्रात जिल्हाधिकारी, जळगाव यांनी मतदानाकरीता स्थानिक सुटी जाहिर करण्याबाबत कळविले आहे.
            ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहिर करण्याबाबतचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले असल्याने परक्राम्य लेख अधिनियम १८८१ चे कलम २५ नुसार जळगाव जिल्हयात ५८ ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणूकीसाठी तसेच १३२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी मतदान होणार असल्याने या दिवशी सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, इत्यादींना लागु राहील (उदा. राज्य शासन, केंद्रशासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर मॉल्स, रिटेलर्स इत्यादी)
       अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे नसेल तर मतदान क्षेत्रातील मतदानाचा हक्क बजाविता येण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल त्या अनुषंगाने जळगाव जिल्हयात ५८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी दि. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी मतदान होणार असल्याने त्या क्षेत्रासाठी सार्वजनिक सुटी जाहिर करण्यात येत आहे.
००००

No comments:

Post a Comment