Saturday, 17 February 2018

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूबांना आर्थिक मदत दोन शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर

                       
जळगाव, दि. 17 - विविध कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुंटूंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या समितीपुढे एकूण 14 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी दोन प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे.
               या बैठकीत विशाल देविदास बाविस्कर, पातोंडा ता. अमळनेर, मन्साराम बाबुराव पवार, टिटवी ता. पारोळा या दोन शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला.       
                                                                          000000

No comments:

Post a Comment