सुधारित
जळगाव, दि. 20 - भारतीय हवामान विभागाने जळगाव
जिल्ह्यात 23 व 24 फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता
वर्तविली आहे. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी
कार्यालय, जळगाव यांचेमार्फत जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सर्तकतेचा इशारा दिला
आहे.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी दिलेल्या
सुचनांचे पालन करावे व शेतमालाचे होणारे नुकसान टाळावे. शेतमाल सुरक्षित ठिकाणी
साठवून ठेवावा. तसेच शेतमालाचे अधिक नुकसान होणार नाही यासाठी सतर्क रहावे. तसेच
सुरक्षित ठिकाणी तात्काळ शेतमाल स्थलांतरीत करावा. बाजार समितीमध्ये शेतमाल
विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेत तर तो माल व्यवस्थितपणे झाकून व
सुरक्षित ठेवावा.
तसेच आकाशातुन पडणाऱ्या वीजेपासुन
बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, झाडाखाली, पत्र्याच्या
शेडमध्ये, वीजवाहिनी, विघुत ट्रान्सफार्मर जवळ थांबु नये. पाऊस, गारपीट,
अतिवृष्टिमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे. गारपीट,
अतिवृष्टि होत असल्यास वाहनांचे नुकसान टाळणेसाठी वाहने सुरक्षित ठिकाणी पार्कींग
करावेत. जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे.
सर्व प्रकारच्या विद्युत तारा व
विद्युत खांबापासुन दुर रहावे. पाण्यातील विद्युत खांब, तारा व विद्युत उपकरणांना
हात लावु नये. कोणत्याही धोकेदायक ठिकाणी सेल्फी काढण्यास जावू नये व धोका पत्करु
नये. धार्मिक यात्रा व पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविक/पर्यटकाने आपत्ती
व्यवस्थापन नियंत्रण कक्षात पर्यटनाची माहिती द्यावी म्हणजे त्यांचे अडचणींच्या
वेळी मदत करणे जिल्हा प्रशासनास शक्य होईल.
अधिक माहितीकरीता जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष, पोलीस विभाग, महानगरपालिका, जळगाव, अग्निशमनदल यांचे
संपर्कात रहावे. संपर्कासाठी क्रमांक- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष
टोल फ्री क्रमांक - 1077, दुरध्वनी क्रमांक 2217793/2223180, जळगाव शहरातील कायदा
व सुव्यवस्था, वाहतुक नियमन व बचावकार्य, कृषि विभाग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
कार्यालय, दुरध्वनी क्रमांक 0257-2239054 आणि उप विभागीय कृषि अधिकारी कार्यालय,
दुरध्वनी क्रमांक-0257-2229317, जळगाव शहर पोलीस नियंत्रण कक्ष - टोल फ्री - 100, दुरध्वनी क्र 2223333/2235235, जळगाव
ग्रामीण कायदा व सुव्यवस्था, वाहतुक नियमन व बचावकार्य. जळगाव शहर महानगरपालिका,
जळगाव नियंत्रण कक्ष- दुरध्वनी क्रमांक 2237665, जळगाव शहरात पाणी साचणे, घुसणे,
वृक्ष, इमारत कोसळणे, सर्व प्रकारच्या शोध व बचावासाठी अग्निशमन विभाग - टोल फ्री
101/102 व दुरध्वनी क्रमांक 2224444 यावर संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी
तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment