जळगाव, दि. 6 - शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचा फेब्रुवारी 2018 चा अंक नुकताच प्रकाशित झाला आहे.
या महिन्यात 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बडोदे येथे होत आहे. त्याचबरोबर या महिन्यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांची जयंती (27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिवस म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे संमेलनाविषयीचे विचार मांडणारा शारदादेवीची यात्रा हा लेख. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचेवर डॉ. अशोक राणा यांचा प्रबोधनाचे शिल्पकार, अपर्णा गावडे यांचा सारे काही मराठीसाठी, आनंद हर्डीकर यांचा अशी करावी अक्षरसाधना, भाषा सल्लागार समितीचे अध्यष डॉ. सदानंद मोरे यांचा मराठी भाषेच्या रुपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन, व्यवसाय मार्गदर्शन यावर अविनाश धर्माधिकारी यांचा यशोशिखरावर कसे जाल ? हा लेख. यासह मा. मुख्यमंत्री महोदयांच्या दावोस दौऱ्यावरील मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषद 2018 चा वृत्तांत. तसेच शासनाच्या विविध विभागांच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची माहिती व विविध विषयांवरील मान्यवर लेखकांच्या लेखांचा या अंकात समावेश करण्यात आला आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्य मासिक दरमहा प्रकाशित करण्यात येते. लोकराज्य मासिकाचा प्रत्येक अंक हा वाचनीय व स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असतो. लोकराज्य मासिकाचा या महिन्याचा अंक जिल्ह्यातील प्रमुख स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. लोकराज्य मासिकाच्या वार्षिक वर्गणीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.
०००

No comments:
Post a Comment