जळगाव,
दि. 14 - जळगाव जिल्ह्यातील नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहवीच्या प्रवेशासाठी
(2018-19) जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2018 शनिवार 21 एप्रिल, 2018 शनिवार
रोजी होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एकूण 30 नियोजित केंद्रावर ही
परीक्षा होणार आहे. सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी तसेच पालक
व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
परीक्षेच्या
प्रवेशपत्रा संबधित सुचना प्रकाशित केल्या जाणार आहे. या निवड चाचणीसाठी ज्या शाळा
केंद्र म्हणून नेमल्या गेलेल्या आहेत. त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी परीक्षेची
तारीख 21 एप्रिल, 2018 प्रमाणे आपल्या कामाचे नियोजन करावे. असे आवाहन वी. एन. राव, प्राचार्य, जवाहर नवोदय
विद्यालय, साकेगांव, भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment