जळगाव,दि. 1 - भारत सरकार शिष्यवृत्ती, तसेच शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क ही योजना सन
2017-18 या शैक्षणीक वर्षामध्ये सुधारित पध्दतीने राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील
अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राचार्यांनी सुधारित पध्दतीचा अवलंब
करुन विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे आवाहन खुशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त,
समाजकल्याण यांनी केले आहे.
नुतनीकरण अर्जसाठी सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य् विभागाच्या महाईस्कॉल या जुन्या प्रणालीवरील सन 2016-17 या
वर्षातील संबंधीत महाविद्यालयामार्फत पुर्वीप्रमाणेच महाईस्कॉल प्रणालीवरील
कार्यपध्दतीनुसार नुतनीकरण करुन, सहाय्य्क आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव
यांच्या लॉगीनवर ऑनलाईन पाठविण्यात यावे.
तसेच नविन अर्जासाठी सन 2017-18 करीता
महाविदयालयात ज्या नवीन (Fresh) प्रवेशीत विद्यार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर
अर्जाची नोंदणी केलेली आहे. असे विदयार्थी व जे विदयार्थी तांत्रीक अडचणीमुळे
महाडिबीटी प्रणालीवर नोंदणी करु शकले नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांकरीता
महाईस्कॉल प्रणालीवरील अपलोड करण्यात आलेल्या अर्जाच्या नमुन्यात महाविदयालयांनी
विदयार्थ्यांचे अर्ज, ऑफलाईन पध्दतीने स्वीकारुन ते सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालय, जळगाव येथे सादर करावे.
संबंधीत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे
आधार संलग्न बँक खात्याची माहिती अर्जात नमूद करावी. जेणकरुन विद्यार्थ्यांची
शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करणे सोईचे होईल. असेही सहाय्यक
आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment